आमच्याबद्दल

गडदवणे हे भारताच्या महाराष्ट्र राज्यातील नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव आदिवासी बहुल भागातील गाव असून सन २०११ च्या जनगणनेनुसार ९४९ इतकी लोकसंख्या असलेले बोरपाडा, फणसपाडा,देवीचापाडा व काकडदरी अशा छोट्या वस्त्यांनी असलेले ग्रामपंचायत आहे.

गावामध्ये जि. प. शाळा – २, , अंगणवाडी – ३,  धार्मिक देवाश्थाने – २, अशी सोय आहे. सप्तसूत्रीचे पालन करणारे सर्वगुणसंपन्न असे हे गाव आहे.

या गावच्या प्रथम लोकजनयुक्त सरपंच सौ. यमुना हिरामण जाधव यांनी हा मान मिळवलेला आहे. गावास घरकुल योजना, स्वच्छता, लिंग  गुणोत्तर, पाणलोट विकास या क्षेत्रात विकासाच्या दृष्टिने ग्रामपंचायत प्रगतशील  आहे.

भौगोलिक माहिती

हे गाव त्र्यंबकेश्वर तालुक्यातील असून त्र्यंबकेश्वर तालुक्याच्या नाशिक जिल्ह्यातील पश्चिम भागात आहे.

गावाचे भौगोलिक क्षेत्रफळ एकूण  ५९०.६ हेक्टर इतके आहे. यामधील काही भाग पाटबंधारे विभागाच्या कार्यक्षेत्रात येतो, तर काही भाग वनविभाग, ग्रामपंचायत गावठाण तसेच शेतकरी यांच्या मालकीचा आहे. एकूण क्षेत्रफळ ५९०.६ हेक्टर एवढेच आहे.

 

लोकजीवन

गडदवणे गावाचे लोकजीवन साधे, कष्टाळू व परंपरांशी जोडलेले आहे. शेती हा  प्रमुख व्यवसाय असून भात, ज्वारी, बाजरी, नाचणी व भाजीपाला यांचे उत्पादन केले जाते. शेतीबरोबरच पशुपालन व दुग्ध व्यवसाय हा ही महत्त्वाचा आधार आहे. गावातील लोक पारंपरिक रूढी-परंपरा पाळून एकत्रितपणे सण-उत्सव साजरे करतात. भजन, कीर्तन, वारकरी संप्रदाय तसेच स्थानिक लोककला गावाच्या सांस्कृतिक जीवनात महत्त्वाचे स्थान राखतात.

लोकसंख्या

खाली जनगणना २०११ च्या आकडेवारीनुसार बाफनवीहिरचे संक्षिप्त लोकसंख्या विहंगावलोकन आहे. 

Particulars

Total

Male

Female

Total Population

949

497

452

Literate Population

531

313

218

Illiterate Population

418

184

234

संस्कृती व चालिरिती

सण-उत्सव

गुढीपाडवा, दिवाळी, होळी, मकरसंक्रांत हे प्रमुख सण उत्साहाने साजरे केले जातात. गावातील जगदंबा माता मंदिर येथे नवरात्रीत मोठी यात्रा भरते

धार्मिक श्रद्धा

जगदंबा माता मंदिर येथे देवीला केलेले नवस पूर्ण होतात असे गावकऱ्यांची व परिसरातील सर्वांची श्रद्धा आहे.नवस पूर्ण झालेले भाविक मोठ्या संख्येने नवरात्री मध्ये देवीची पूजा करण्यासाठी खूप दूर दुरून येतात. गावात लहानमोठी देवळे, उत्सव मंडळे व भजन-कीर्तन यांची परंपरा आहे.

लोककला व परंपरा

ढोल-ताशा, लेझीम, भजन, कीर्तन, गावकी नृत्ये, तारपा व संभळ याच्यावरील नृत्य व लोककला गावाच्या सांस्कृतिक परंपरेत जपल्या जातात. पारंपरिक विवाह सोहळे व जात्यावरच्या ओव्या आजही ऐकायला मिळतात.

आहारसंस्कृती

ज्वारी-भाकरी, वरण-भात, पिठलं-भाकरी, हिरव्या भाज्या हा पारंपरिक आहार आहे. नागपंचमी, पोळा, दिवाळीत खास पदार्थ जसे की करंजी, लाडू, पुरणपोळी तयार केली जाते.

सामाजिक एकोपा

ग्रामपंचायत व गावकरी मिळून सामुदायिक उत्सव, वार्षिक यात्रा, व्यायामशाळा कार्यक्रम आयोजित करतात. सप्तसूत्रीचा अंगीकार करून गाव विकासाच्या परंपरेला चालना दिलेली आहे.

महत्वाची स्थळे

माहिती उपलब्ध नाही

आसपासची गावे

हरसुल, जातेगाव बु, सारस्ते, चिरापाली, सापतपाली, जातेगाव खु, महादेवनगर, मुरंबी, शिरसगाव(ह)

 

ग्रामपंचायत प्रशासन

 

 

अ.क्र.

नाव

पद

मोबाईल क्रमांक

1

सौ.यमुना हिरामण जाधव

सरपंच

-

2

श्री. लक्ष्मन पोपट भोये

उपसरपंच

-

3

श्री. पुंडलिक पांडुरंग जाधव

ग्रा. सदस्य

-

4

श्री. तुकाराम किसन डगळे

ग्रा. सदस्य

-

5

सौ. माई दिनेश भुसारे

ग्रा. सदस्य

-

6

सौ. मिरा उत्तम भोये

ग्रा. सदस्य

-

7

सौ. सायजा भागीरथ जाधव

ग्रा. सदस्य

-

8

सौ. काळीबाई तुळशीराम चौधरी

ग्रा. सदस्य

-

12

श्री.देविदास शंकर दळवी

ग्रा. शिपाई

-

14

श्री. मुरलीधर निवृत्ती शिंदे

ग्रा.से-सेवक

-

15

श्री. भाऊसो धर्मराज धांडोरे

ग्रामपंचायत अधिकारी

 

प्रशासन


Logo 1
Logo 2
Logo 3
Logo 4
Logo 5
Logo 6
Logo 7
Logo 8
Logo 9
Logo 10
Logo 11